RADHEY by Ranjit Dessai (marathi)

जऱ्ही कुंती त्याची माता होती, तो पुत्र राधेचा होता, तो राधेय होता.



महाभारत माहित असलेल्या सगळ्यांना कर्ण ठाऊक असेलच. सूर्य आणि कुंतीची संतान, सुवर्ण कवच कुंडलांसहित जन्मलेला कर्ण, राधा आणि अदिरथ यांच्या घरी यांचा पुत्र म्हणून वाढलेला, वसू, वसुसेन, महर्षी परशुरामाचा शिष्य, दुर्योधनाचा मित्र, अंगारज, द्रौपदीची अवहेलना करणारा, अभिमन्यूचा वध करणारा, सुत कुळातील क्षत्रिय, दानवीर, महाभारताच्या धर्मयुद्धात पराक्रम गाजवून वीरगतीस प्राप्त झालेला सामर्थ्यवान योद्धा. राधेय.

#रणजित_देसाई राधेय ह्या अमूल्य रचानेबद्दल आभार.
 
ह्या अश्या महाभारतातील वीराबद्दल कुतूहल निर्माण झाले. पण माझ्या कल्पनेतला कर्ण मला सापडतच नव्हता. अन् अचानक एक दिवस हे पुस्तक माझ्या हाती आले. पुस्तक उघढून पहिला अध्याय वाचताच माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ही पहिलीच वेळ असावी की मी एखादे पुस्तक वाचताना रडले होते. ह्या पुस्तकातील कर्ण माझ्या कल्पनेशी मिळता जुळता होता. त्याचे व्यक्तित्व खुलून व्यक्त केले होते. कथेत घडत असलेले प्रसंग सत्य वाटत होते. महाभारतातील विविध घटनांचा कर्णावर काय परिणाम झाला असावा, याचे उत्तम वर्णन केले होते. जस जसे पुस्तक संपत होते खरंच मी ह्या कर्णाच्या प्रेमात पडत होते. तशीच जादू आहे रणजित देसाईंच्या शब्दांची. जेव्हा मी हे पुस्तक हाती घेतले माझ्या मनात अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरे मला जरूर सापडली, पण शेवटचे पान उलतटना नव्या प्रश्नांचा साठा तयार झाला. कुतूहल अधिक वाढले. अजून वाढत आहे.

कर्णला जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.

रणजित देसाई

 हे पुस्तक 1976 मध्ये लिहिले गेले. हे रणजित देसाई यांच्या उत्तम लिखाणाचा एक भाग आहे. रणजित रामचंद्र देसाई (जन्म : ८ एप्रिल १९२८; मृत्यू : ६ मार्च १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.

Comments

Popular Posts